आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

गटतट बाजूला ठेवून एकदिलाने मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा; इंदापूरमधील मेळाव्यात अजितदादांकडून कार्यकर्त्यांना सूचना

पुणे
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना एकदिलाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण न करता गटतट बाजूला ठेवा आणि एकदिलाने निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज इंदापूरमध्ये झालेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात दिल्या.

इंदापूरच्या जुन्या बाजार समिती आवारात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आमदार दत्तात्रय भरणे, युवा नेते जय पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सुरेश घुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, किरण गुजर, हनुमंत कोकाटे, बाळासाहेब ढवळे, शुभम निंबाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भागातील जनतेची कामे व्हावीत यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत. आजवर अनेक संधी आपल्याला या जनतेमुळे मिळाल्या आहेत. त्यामुळे यापुढील काळातही जनतेची साथ असेल तर मागील पाच वर्षात न झालेली कामे आगामी काळात पूर्ण करून दाखवू अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. आपण केंद्र आणि राज्यात महायुती केलेली आहे.  त्यामुळे आपण सर्वांनीच एकदिलाने राहून निवडणुकीच्या कामाला लागावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

यावेळी इंदापूर शहर व तालुक्यातील विकासकामांचा आढावा अजितदादांनी आढावा घेत आगामी काळातही अनेक प्रकल्प मार्गी लावले जातील, असं आश्वासनही दिले. कुठेही भावनिक होवू नका असं आवाहन करत तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही अशा शब्दही त्यांनी दिला. आपला लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचा असेल, तर अनेक कामे मार्गी लागतील. येत्या निवडणुकीत आम्ही जो उमेदवार देऊ, तो प्रचंड मताधिक्याने निवडून येईल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केले.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us
%d