आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

INDAPUR : इंदापूरकरांना भावला जय पवार यांचा साधेपणा; कार्यकर्त्यांसोबत बसून ऐकली सभा..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध भागात भेटी देत आहेत. आज इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याला जय पवार यांनी हजेरी लावली. सभेत दाखल झाल्यानंतर व्यासपीठावर न जाता जय पवार यांनी कार्यकर्त्यांसह बसून संपूर्ण सभा ऐकली. त्यांचा हा साधेपणा इंदापूरकरांना भावणारा ठरला.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये शेतकरी व कार्यकर्ता मेळावा पार पडला. तत्पूर्वी जय पवार यांची इंदापूरमधून मिरवणूक काढण्यात आली. तसेच इंदापूरकरांनी जय पवार यांचं जोरदार स्वागत केलं. या मेळाव्याला इंदापूर व परिसरातील शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

जय पवार हे कार्यकर्त्यांसह सभास्थळी दाखल झाल्यानंतर ते व्यासपीठावर जात असतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे न करता जय पवार हे व्यासपीठासमोरच कार्यकर्त्यांसमवेत बसले. संपूर्ण सभा त्यांनी कार्यकर्त्यांसह बसून ऐकली. राज्यातील वजनदार नेते असलेल्या अजितदादांचे चिरंजीव आणि प्रचंड मोठ्या राजकीय कुटुंबातून असतानाही जय पवार यांनी कोणताही अविर्भाव न बाळगता दाखवलेला साधेपणा इंदापूरमधील नागरिक व कार्यकर्त्यांना भावणारा ठरला.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d