आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

DAUND CRIME : दौंड शहरातील भाजी मंडईत दोन गटात राडा; दौंड पोलिसांकडून वादावादी करणाऱ्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’

पुणे
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

दौंड शहरातील भाजी मंडईत एकमेकांशी वाद घालून शिवीगाळ, मारहाण करून आरडाओरडा करणाऱ्या दहा जणांवर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील नऊ जणांना अटक केली असल्याची माहिती दौंड पोलिसांकडून देण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, दौंड शहरातील भाजी मंडईत दोन गटात वाद झाला. एकमेकांना शिवीगाळ व मारहाण करत आरडाओरडा करत हे दोन्ही गट भिडले. याबाबतची माहिती समजल्यानंतर तात्काळ दौंड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी दोन्हीही गटात मारामारी सुरु होती. आरोपींनी एकमेकांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जोरात आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी दोन्हीही गटाच्या लोकांना बाजूला घेऊन दौंड पोलीस ठाण्यात आणले. भांडणाचे कारण विचारल्यावर त्यांनी ‘फळाच्या दुकानासमोर थांबल्याने किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे सांगितले.

करमचंद बंडगर यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी इसम नामे वाहिद हाशम शेख (रा.विठ्ठलवाडी मंदिरासमोर दौंड), रफिक अब्दुल रहेमान बागवान (रा.गांधीचौक इंदिरानगर), सलमान गफार शेख (रा.गांधीचौक इंदिरानगर), अफजल इस्लाम शेख (रा.साईबाबा मंदिर आग्रवाल शाळेशेजारी दौंड), बिट्टू कुमार अनिल मोदी (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), फंटूस कुमार प्रकाश यादव (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), शंकर कुमार निरंजन माहतो  (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), कारू कुमार निरंजन माहतो (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), पप्पू महेश चौधरी (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), अशा जणांवर भा.द.वी. कलम १६०,३२३,५०४,५०६, महाराष्ट्र कायदा कलम ११०,११२,११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुभाष राऊत, अमीर शेख, करम बंडगर, योगेश पाटील, किरण पांढरे आदींनी केली.

अन्यथा होणार कारवाई..!

कुणीही सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नये. दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही असे प्रकार घडत असतील तर अशांवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही नागरिकांबाबत असे काही त्रास देण्याचे प्रकार होत असतील तर नागरिकांनी याबाबत तक्रार करावी असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us
%d