आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

PUNE CRIME : गॅंगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे; ‘या’ बाबींचा केला जाणार उलगडा

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या अधिपत्याखालील पथकाकडून या हत्या प्रकरणाची उकल केली जाणार आहे. या हत्या प्रकरणात कुणाचा सहभाग आहे आणि याचा मास्टरमाईंड कोण या दृष्टीकोनातून गुन्हे शाखेकडून तपास केला जाणार आहे.

शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी दुपारी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली होती. जमिनीच्या जुन्या वादातून शरद मोहोळ याच्यासोबत असणाऱ्या साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.

या हत्या प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडाण यांना अटक करण्यात आली आहे. प्रारंभी कोथरुड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यानंतर आता गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे हा तपास सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज दिले आहेत.

गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची उकल केली जाणार आहे. सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या अधिपत्याखालील पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यातून या प्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे आणि या हत्येमागे मुख्य सूत्रधार कोण अशा अनेक गोष्टींचा उलगडा केला जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us
%d