आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

चौथे महिला धोरण नारी शक्तीला बळ देणारे ठरेल; महायुती सरकारच्या महिला धोरणाचे सुनेत्रा पवार यांच्याकडून स्वागत

महिला दिनी दिलेल्या अनमोल भेटीबद्दल महाराष्ट्रातल्या महिलांच्यावतीने महायुती सरकारचे मानले विशेष आभार

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या मातीला सामाजिक न्यायाची, महिला सशक्तीकरणाची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र सरकारने जागतिक महिला दिनी  ‘चौथे महिला धोरण’ आणून पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आणखी ठळक केली आहे. चौथे महिला धोरण पुरोगामी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे असून तमाम नारी शक्तीला बळ देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत बारामती हाय टेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी चौथ्या महिला धोरणाचे स्वागत केले आहे. महिला दिनी महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींना दिलेल्या या अनमोल भेटीबद्दल महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

सौ. सुनेत्रा पवार आपल्या संदेशात म्हणतात, महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या देदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. यंदाच्या जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण अंमलात आणून महायुती सरकारने राज्यातील महिलाशक्तीला नवे बळ दिले आहे. वडिलांसोबत आईचे देखील नाव बाळाच्या नावापुढे अनिवार्य करून महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा सन्मान केला आहे.

चौथ्या महिला धोरणामुळे राज्यातील महिलां सन्मान वाढवणाऱ्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा या धोरणात समावेश असून त्यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातला सहभाग वाढण्यास निश्चितच मदत होईल. यातून महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान उंचावेल, असा विश्वास व्यक्त करुन महायुती सरकारने आणलेल्या चौथ्या महिला धोरणाचे सौ. सुनेत्रा पवार यांनी स्वागत करीत जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d