आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

Baramati Breaking : शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बारामतीत दंडेलशाही, चूक नसताना वकिलालाच केली मारहाण; बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच बारामतीत शरद पवार गटाकडून दंडेलशाही सुरु असल्याचं समोर आलं आहे. एका वाहनाला धडक दिल्यानंतर शरद पवार गटातील कार्यकर्ते व महिलांनी संबंधित वकिलालाच अश्लिल भाषेत शिविगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर वकिल संघटनेने आक्रमक होत संबंधित महिला आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत माहिती अशी की, ॲड. अजित बनसोडे हे आपल्या चारचाकी वाहनातून रिंगरोडने न्यायालयाच्या दिशेने निघाले होते. या दरम्यान, त्यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनाने धडक दिली. त्यानंतर या वाहनातील कार्यकर्ते व महिलांनी या वकिलाला अश्लिल भाषेत शिविगाळ करत मारहाण केली. त्यामुळे आता वकिल संघटनेने आक्रमक पवित्रा घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

बारामती शहर पोलिस ठाण्यात वकिल संघटनेचा ठिय्या 

बारामती वकिल संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी बारामती शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. कोणतीही चूक नसताना दंडेलशाही करुन मारहाण व शिविगाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वकिलांकडून करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

निवडणुकीआधीच दादागिरी; नंतर काय..?

या घटनेनंतर शरद पवार गटातील कार्यकर्ते व महिलांच्या दादागिरीचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे शरद पवार गटाचे नेते विरोधकांना लक्ष्य करत असताना त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांची दंडेलशाही समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच जर शरद पवार गटाचे कार्यकर्ते असे वागत असतील तर पुढे त्यांचं वागणं कसं असेल असा सवाल वकिलांसह सामान्य नागरीक उपस्थित करु लागले आहेत. 


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d