आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

मोठी बातमी : राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनानंतर ठरवणार मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा; मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी मंगळवारी दि. २० फेब्रूवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनात काय निर्णय होतो हे पाहून आपण आरक्षणाबद्दलच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहिर केलं आहे.

राज्य सरकारने २० फेब्रूवारी रोजी विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. यात सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा अशी मनोज जरांगे पाटील यांची आग्रही मागणी आहे. त्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भुमिका स्पष्ट केली.

उद्या शिवजयंती आहे.. त्यानंतर राज्य सरकारचं अधिवेशन होणार आहे. सरकारने ज्यांना दाखले दिलेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करुन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहून आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d