आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; म्हणाले, संकटांचं विस्मरण करत आनंदाने राहण्याचे दिवस..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चढउतार, अडचणी असतात. काहीदा संकटालाही सामोरे जावं लागतं. संकटांचं विस्मरण करून कुटुंबियांसमवेत आनंदाने राहण्याचे दिवस म्हणजे दिवाळीचा सण असतो. पुढील दोन तीन दिवस आनंदात आणि उत्साहात सण साजरा करतील अशी अपेक्षा व्यक्त करत शरद पवार यांनी दिवाळी सुखाची व समृद्धीची जावो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

संपूर्ण पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त एकत्र येत असतं. काल रात्री शरद पवार हे बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी दाखल झाले. सकाळी त्यांची विविध भागातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या दरम्यान, शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संकटांना विसरून हा सण साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं.

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चढउतार आणि अडचणी असतात. प्रसंगी संकटानाही तोंड द्यावं लागतं. मात्र प्रत्येक वर्षात काही दिवस असे असतात की संकटाचं विस्मरण करून कुटुंबासमवेत आनंदानं दिवस घालवावा, जगावं अशा प्रकारची इच्छा असते. ही इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस हा दीपावलीत असतो. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात येत्या दोन-तीन दिवसांत लोक आनंदानं आणि उत्साहानं दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी काळजी घेतात, प्रयत्न करतात, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचा सण आनंदानं जावो, त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो आणि पुढच्या आयुष्यासाठी त्यांनी जो कार्यक्रम आखला असेल त्यामध्ये भरभरून यश येवो अशा सदिच्छा व्यक्त करत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d