आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

वकील संरक्षण कायद्यासाठी आग्रही राहणार; वकिलांच्या स्नेहमेळाव्यात सुनेत्रा पवार यांची ग्वाही

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

जगाच्या इतिहासात वकीलांचे स्थान मोलाचे राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यासह देशाच्या उभारणीमध्ये वकील असणार्‍या नेत्यांचे मोठे योगदान आहे. समाजातील सर्वच घटकांना सामावून घेत न्यायासाठी लढणाऱ्या वकीलांच्या विविध प्रश्नांसह वकील संरक्षण कायद्यासाठी आग्रही राहणार असल्याची ग्वाही बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.

बारामती, इंदापूर आणि दौंड बार असोसिएशनच्या वकीलांच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याला तीनही तालुक्यातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. जी. बी. गावडे, अ‍ॅड. जी. के. देशपांडे, अ‍ॅड. आर. डी. प्रभुणे, अ‍ॅड. व्ही. बी. गावडे, अ‍ॅड. व्ही. एस. बर्गे, अ‍ॅड. अविनाश गायकवाड, अ‍ॅड. विनोद जावळे, अ‍ॅड. शामराव कोकरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

तालुक्याच्या ठिकाणीच सर्वसामान्य जनतेला जलद गतीने न्याय मिळावा यासाठी अजितदादांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यातून न्यायालयाच्या भव्य इमारतींची उभारणी झाली आहे. न्यायालयाच्या आवारात आवश्यक असलेल्या सोईसुविधांबाबत वकील वर्गाकडून व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू, तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.

यावेळी बारामती वकील संघटनेच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. उमेश काळे, अ‍ॅड.रमेश कोकरे, अ‍ॅड.हरिष तावरे, अ‍ॅड.नितीन भामे, अ‍ॅड.प्रभाकर बर्डे, अ‍ॅड.सुप्रिया बर्गे, अ‍ॅड.स्नेहा भापकर, अ‍ॅड.प्रिया गुजर, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अ‍ॅड. निलिमा गुजर तसेच दौंड वकील संघटनेच्या वतीने अ‍ॅड. अझरुद्दीन मुलाणी, अ‍ॅड.संदीप शेलार तर इंदापूर वकील संघटनेच्या वतीने अ‍ॅड.किरण धापटे आदींनी आपले मनोगत व्यक्‍त केले.

यावेळी बारामती, इंदापूर, दौंड बार असोसिएशनच्या वतीने सुनेत्रा पवार यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. शलाका धैर्यशील जगताप यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन अ‍ॅड.अमर महाडीक यांनी केले, तर अ‍ॅड. शुभम निंबाळकर यांनी आभार मानले.

तुम्ही दादांना साथ दिलीत, आम्ही तुम्हाला साथ देऊ

वकीलांच्या समस्यांबाबत यापूर्वी ज्यावेळी अजितदादांकडे गेल्यानंतर त्यांनी अपेक्षेपेक्षा काकणभर अधिकच दिले आहे. सौ. सुनेत्राताई या स्वत:ही गेली २५ वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, महिला सबलीकरण, ग्रामस्चच्छता अशा विविध पातळीवर त्यांनी योगदान दिले आहे. वकीलांसोबत सर्वच घटकांसाठी अजितदादांनी दाखवलेली तडफ आज सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. अजितदादांच्या या तडफेला भक्कमपणे साथ देण्याचे काम सुनेत्राताईंनी केले असून आता त्यांना भरभक्कमपणे साथ देण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये आम्ही अग्रेसर राहू, अशी ग्वाही यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतात दिली.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d