आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

MAHA POLITICS : बारामतीत उद्या विविध विकासकामांच्या उदघाटनांसह नमो महारोजगार मेळावा; बारामतीत जमणार राजकीय नेत्यांची मांदियाळी

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथील पोलिस उपमुख्यालय, पोलिस वसाहत, बसस्थानक, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय व बारामती शहर पोलिस ठाण्याच्या इमारतीचं उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. शरद पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नमो महारोजगार मेळावा संपन्न होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामतीनजीक असलेल्या बऱ्हाणपूर येथे भव्यदिव्य पोलिस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे. तसेच बारामती शहरात पोलिस वसाहत, अद्ययावत बसस्थानक, अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, बारामती शहर पोलिस ठाणे आणि वाहतूक नियंत्रण विभाग या इमारतींचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

तर सकाळी १०.३० वाजता विद्या प्रतिष्ठानच्या भव्य मैदानात नमो महारोजगार मेळाव्याचं उदघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीत राजकीय नेत्यांची मांदियाळी जमणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे शरद पवार यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर असणार आहेत. त्यामुळे बारामतीत उद्या होत असलेल्या या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d