आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
Uncategorized

Sad Demise : माळेगाव कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढवाण पाटील यांचं निधन

Uncategorized
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव ढवाण पाटील यांचे आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

शिवाजीराव ढवाण हे मागील काही दिवसांपासून हृदयाच्या विकारामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली होती. मात्र उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

माळेगाव कारखान्यासह विविध संस्थांची पदे त्यांनी भुषवली होती. बारामतीत होणाऱ्या उरुसाच्या आयोजनामध्ये त्यांचा पुढाकार असायचा. त्यांच्या निधनाने बारामतीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


ह्याचा प्रसार करा
Uncategorized
Back to top button
Contact Us
%d