आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
Uncategorized

Crime Breaking : शेजाऱ्यांकडून शिवीगाळ; जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न, पुण्यातील धक्कादायक घटना

Uncategorized
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करत लघवी पाजण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुसगाव येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात चार महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका महिलेने शनिवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  शेजारी राहणाऱ्या भावकीतील व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी संबंधित महिला आपल्या सांसऱ्यांसोबत गेली होती.

आम्हाला शिवीगाळ का करता असा जाब विचारल्यानं संबंधित आरोपींनी काठी, चपला आणि लाथाबुक्क्याने फिर्यादी महिला व तिच्या सासऱ्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता संबंधित आरोपींनी बाटलीत लघवी गोळा करून पाजण्याचा प्रयत्न केला. तसेच या महिलेसह तिच्या सासऱ्याला एका खोलीत डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ही धक्कादायक घटना १५ मे रोजी घडल्यानंतर संबंधित कुटुंब प्रचंड तणावात होते. शनिवारी त्यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चार महिलांसह एकूण आठ जणांवर भादंवि कलम ३५४, ३२४,३४२, १४३, १४७, १४८, ३२३, ५०४ नुसार विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश खारगे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Uncategorized
Back to top button
Contact Us
%d