आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

महायुतीच्या जागावाटपावर उद्या निर्णयाची शक्यता; महायुतीतील सर्व पक्षांचा सन्मान राहील : अजितदादांनी दिली माहिती

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

महायुतीच्या जागा वाटपाबाबत उद्याच निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुतीतील सर्व पक्षांचा सन्मान राहील अशा पद्धतीने जागा वाटप होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच उद्या याबाबत महायुतीचे प्रमुख नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. उद्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आपण अन्य नेत्यांसह दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे विमानतळाच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी जागा वाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांनी उद्याच निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं. महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर सर्व उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती देऊन अजितदादा म्हणाले, सर्व पक्षांचा सन्मान राहील अशाच पद्धतीने जागावाटप होईल.

उद्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह दिल्लीत जाणार आहोत. त्या ठिकाणी जागा वाटपाचा निर्णय होणार असून त्यानंतर महायुतीतील पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जाईल, असंही अजितदादांनी स्पष्ट केलं.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d