नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशामध्ये काय चित्र आहे हे सगळ्यांना दिसत आहे. सध्या देशात सांप्रदायिक शक्तींचा जोर वाढला आहे. या सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात सर्वांनी एकत्र आवश्यकता आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या माध्यमातून देशांमध्ये प्रपोगंडा पसरवण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या चित्रपटाला परवानगी देण्याची गरजच नव्हती, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, देशामध्ये जेव्हापासून भाजपाचे सरकार अस्तित्त्वात आले आहे. तेव्हापासून संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा, असा प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडून देशातील शालेय अभ्यासक्रम बदलून लहान मुलांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम चालू आहे.
दुःख याचे वाटते की पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असले तरीसुद्धा त्यांना देश एक ठेवणे महत्त्वाचे असते. मात भारतात उलट परिस्थिती आहे. ज्या चित्रपटामुळे समाजात दुही निर्माण होईल, त्याच चित्रपटाचे पंतप्रधान कौतुक करतात ही अत्यंत क्लेशदायक बाब असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले.