आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

BIG BREAKING : देशभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं. सात टप्प्यात या निवडणुका होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात २० मे रोजी मतदान होणार असून तर संपूर्ण देशाचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे  मुख्य आयुक्त राजीव कुमार, आयुक्त सुखविंदर  संधू, ज्ञानेश कुमार यांनी देशभरातील लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. यामध्ये देशभरात सात टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार असून २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे रोजी मतदान होणार आहे.

सात टप्प्यात मतदान :

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार सात टप्प्यात मतदान होणार आहे.  त्यामध्ये पहिला टप्पा : १९ एप्रिल, दुसरा टप्पा : २६ एप्रिल, तिसरा टप्पा : ७ मे, चौथा टप्पा : १३ मे, पाचवा टप्पा : २० मे, सहावा टप्पा : २५ मे, सातवा टप्पा : १ जून रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाईल. तर संपूर्ण देशभराचा निकाल ४ जून रोजी जाहीर केला जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us
%d