आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

BIG BREAKING : राज्यपाल आणि सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार मोठा निर्णय..?

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अन्य महापुरुषांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्ये केली आहेत. त्यातच आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरून वादही पेटला आहे. कर्नाटककडून होणारी मुजोरी आणि मराठी जनतेवर होणारा अन्याय या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली.

या चर्चेमध्ये अमित शाह यांनी संबंधित विषयांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी येत्या दोन दिवसांत या विषयांवर मोठा निर्णय घेतला जाईल असेही संकेत मिळत आहेत. सीमाप्रश्न आणि राज्यपाल या दोन्ही विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन सध्याची परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा असेल अशीही माहिती मिळत आहे.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us
%d