आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

SHOCKING : जिल्हा परिषद शिक्षकाला रॉडने मारहाण करत पेट्रोल टाकून जीवंत जाळलं; धक्कादायक घटनेनं वाशिम हादरलं..!

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

वाशिम : प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला रॉडने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये  या शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मालेगाव-आमखेडा रस्त्यावरील कोल्ही गावाजवळ ही घटना घडली. त्यात दिलीप धोंडूजी सोनवणे (वय ५४) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते बोरगाव येथील प्राथमिक शाळेत कार्यरत होते. याबाबत माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील बालखेडचे रहिवाशी असलेले दिलीप सोनवणे हे आज सकाळी शाळेत जात होते. मालेगाव शहरापासून जवळच रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या अज्ञात इसमांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्यांना रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले.

दरम्यान, जवळपास अर्धा तास दिलीप सोनवणे हे घटनास्थळी तडफडत होते. त्या दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दाखल होत, त्यांना उपचारासाठी नेले. प्रारंभी त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर वाशिम येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वीही दिलीप सोनवणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यात सुदैवाने ते वाचले होते. मात्र आज भरदिवसा त्यांच्यावर हल्ला करत थेट पेटवून देण्यात आले. त्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला. अतिशय थंड डोक्याने कट रचून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पूर्ववैमानस्यातून ही घटना घडली असावी अशीही शक्यता व्यक्त होत असून जऊळका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार राठोड हे अधिक तपास करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us
%d