आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

BIG BREAKING : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाची तोडफोड; पोलिसांनी वेळीच दक्षता घेतल्यानं अनर्थ टळला

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांची भेटही घेतली. मात्र आंतरवाली सराटीत असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांची आक्रमकता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या ठिकाणाहून निघून जाणे पसंत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. काल अचानक या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. यात अनेक आंदोलक आणि महिलाही जखमी झाल्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जालना येथे जाऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलकांशीही चर्चा केली.

आज शरद पवार हे आंतरवालीत गेलेले असताना त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे एक पथक शरद पवार यांच्या ताफ्यात होते. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनांवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या वाहनाची तोडफोड करून वाहनाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाढता जमाव पाहून पोलिसांनी त्या ठिकाणी न थांबता निघून जाणे पसंत केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us
%d