आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कोकण

Political Breaking : “मला बिनधास्त जीवे मारा पण…” ; भास्कर जाधव यांचा विरोधकांना इशारा

कोकण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर सोमवारी मध्यरात्री हल्ला झाला. हा हल्ला चिपळूण येथील घरावर करण्यात आला आहे. यावेळी अज्ञात व्यक्तीने स्टंम्प आणि बाटल्या घरावर फेकल्या आणि तो पसार झाला. त्यावर अनेक राजकीय नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत.

भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप केले. तर या हल्ल्यानंतर अनेक शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. जय भवानी जय शिवाजी…अशा घोषणा देत अनेकांनी मोर्चा देखील काढला. 

त्याचवेळी, “माझ्या सुरक्षेत मंगळवारी रात्री अचानक कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती,’ असा धडधडीत आरोप भास्कर जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. 

तसेच, मी ४० वर्षांपासून राजकारण सक्रिय आहे. पण आजतागायत मी कधी सुरक्षा मागील नाही. मी माझा शेतीचा व्यवसाय करून राजकारण आलो आहे. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही, असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, असे हल्ले करून तुम्ही मला गप्प करू शकत नाही. जोपर्यंत माझ्या जिवात जीव आहे, तोपर्यंत मी बोलत राहणार. ईडी, सीबीआय, पोलिसांचे छापे, एसीबीचे छापे, पक्ष फोडाफोडी एवढे करूनही तुमचे समाधान झाले नाही. आता तुम्ही विरोधी पक्षातील बोलणाऱ्या नेत्यांचे जीव घेऊन तुमचा पक्ष वाढवणार असाल, तर बिंधास्त मला मारा. मात्र, मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही,’ असा इशारा भास्कर जाधव यांनी विरोधकांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भास्कर जाधव हल्ला प्रकरणात उडी घेतली आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, भास्कर जाधव या सरकारच्या विरोधात बोलत असतील आणि त्यामुळे जर त्यांच्या घरावर हल्ला होत असेल, तर ते योग्य नाही. अशी खंत पवार यांनी व्यक्त केले. 

तसेच, कोणीतरी एक आमदार येतो, हवेत गोळ्या घालतो, कोणी सरकार विरोधात बोलत असेल तर त्यांच्या घरावर गुंड हल्ले करतात, असे प्रकार आपण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही बघितले नाहीत, हे आज बघावं लागते आहे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याचे उत्तर लोक निवडणुकीच्या माध्यमातून देतील, असे म्हणत रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाण साधला आहे.


ह्याचा प्रसार करा
कोकण
Back to top button
Contact Us
%d