आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
कोकण

बसमध्ये सुट्ट्या पैशांवरुन वाद; महिला वाहक आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल..!

कोकण
ह्याचा प्रसार करा

खोपोली : प्रतिनिधी

अनेकदा प्रवास करताना सुट्ट्या पैशांची गरज भासते. त्यातूनच वाहक आणि प्रवाशांत वाद झाल्याचं आपण पाहतो. मात्र रायगड जिल्ह्यातील खोपोलीत हा वाद चक्क फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे. खोपोली नगरपरिषदेच्या बसमध्ये महिला वाहक आणि एका महिला प्रवाशाची जोरदार हाणामारी झाली. प्रवाशांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मात्र या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

खोपोली नगरपरिषदेच्या बसमध्ये ही घटना घडली. महिला प्रवाशाला सुट्टे पैसे देण्यावरून हा वाद झाला. सुरुवातीला महिला वाहक आणि महिला प्रवाशात बाचाबाची झाली. मात्र हा वाद पुढे वाढत थेट एकमेकींच्या झिंज्या धरण्यापर्यंत पोहोचला. उपस्थित प्रवाशांना मध्यस्थी करत हा वाद मिटवला. मात्र दोन महिलांमधील या तूफान राड्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

दरम्यान, खोपोलीतील या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये महिला वाहक आणि महिला प्रवाशी एकमेकीचे केस ओढत मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.


ह्याचा प्रसार करा
कोकण
Back to top button
Contact Us
%d