आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BIG NEWS : उद्या अजितदादा बारामतीत; सकाळी होणार जनता दरबार, दुपारनंतर बुथ कमिटी मेळावा आणि शेतकरी मेळाव्यालाही लावणार हजेरी..! 

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या शुक्रवार दि. १६ फेब्रूवारी रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विकासकामांच्या पाहणीनंतर सकाळी साडेआठ वाजता विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार होणार आहे. दरम्यान, अजितदादांच्या उपस्थितीत दुपारी बुथ कमिटी कार्यकर्ता मेळावा होणार असून संध्याकाळी पणदरे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

अजितदादांचा उद्या बारामती दौरा होत आहे. ते पहाटे ६ वाजल्यापासून बारामती शहर आणि परिसरातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत. सकाळी ८-३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबार होईल. सकाळी १०-४५ वाजता बारामती क्लब येथे बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित उद्योजक मेळाव्यास अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी १२ वाजता पाटस रस्त्यावरील वृंदावन गार्डन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस बुथ कमिटी कार्यकर्त्यांचा मेळावा व संवाद कार्यक्रमाला अजितदादा उपस्थित राहतील. त्यानंतर सहयोग निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ६ वाजता पणदरे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपस्थित राहून अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d