आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI : मृदगंध २०२३ करंडक बारामतीच्या आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलने जिंकला; शेतकरी जगाचा पोशिंदा नाटकाचं सादरीकरण..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृदगंध २०२३ विविध गुणदर्शन स्पर्धेत राधेशाम एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल यांनी सादर केलेल्या ‘शेतकरी जगाचा पोशिंदा’ या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मृदगंध विविध गुणदर्शन स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. यंदा २१ शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला.  या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने सादर केलेल्या निसर्ग माझा गुरु या नाटिकेस द्वितीय तर विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या ओझे अभ्यासाचे की अपेक्षांचे या नाटिकेस तृतीय क्रमांक मिळाला.

म.ए.सो.चे ग.भि. देशपांडे विदयालय (बाय बाय प्लॅस्टिक), विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर (ओझे अपेक्षांचे की अभ्यासाचे) व विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, सुपे यांना उत्तेजानार्थ पारितोषिके प्रदान केली गेली. या स्पर्धेतील इतर पारितोषिके पुढील प्रमाणे- उत्कृष्ट अभिनय पुरुष- शौर्य़ देवकाते (अनंतराव पवार शाळा), उत्कृष्ट अभिनय महिला- यशोधरा खरात (आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल), अभिनय उत्तेजनार्थ पुरुष- वेदांत घाडगे (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय), यश दरडे (विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर), अभिनय उत्तेजनार्थ महिला- मनस्वी चव्हाण (सायरस पूनावाला सीबीएसई), उत्तरा रणवरे (विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यम सीबीएसई), उत्कृष्ठ नेपथ्य- कोमल बोराटे (झैनुबिया इंग्लिश मिडीयम स्कूल),  सर्वोत्कृष्ट लेखन विभागून- रवींद्र गडकर व एस.आर. गाडेकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- मीना ढाकाळकर (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा), नाविन्यपूर्ण प्रयोगाचे विशेष पारितोषिक- रॅप- विद्या प्रतिष्ठान इंग्रजी माध्यमिक शाळा, इंदापूर

सुप्रसिध्द अभिनेत्री शर्वरी जमेनिस, एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अँड. नीलीमा गुजर तसेच परिक्षक गजानन भिसे, संजय जोशी व हर्षदा अभ्यंकर, संस्थेचे रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविकात फोरमच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. २३, २४ व २५ डिसेंबर रोजी बारामती फेस्टीव्हलचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.  गजानन भिसे, संजय जोशी व हर्षदा अभ्यंकर परिक्षक म्हणून परिक्षण केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. अमर महाडीक यांनी आभार मानले.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d