आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

POLITICAL BREAKING : भाजपकडून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर मोठी जबाबदारी; पुणे जिल्हा समन्वयकपदी निवड

राजकारण
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी  

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा समन्वयकपदी आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. एकीकडे पुणे जिल्ह्यासाठी दोन अध्यक्षांची नेमणूक केलेली असताच समन्वयक म्हणून राहुल कुल यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये पूर्वी पुणे जिल्हा ग्रामीण हा संपूर्ण जिल्हा होता. यावर्षीपासून यामध्ये बदल करत दक्षिण व उत्तर असे दोन जिल्हे निर्माण केले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्षांची नेमणुक केली आहे.   यामुळे या दोन्हीही ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी ही आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे. यावरून एक प्रकारे आमदार राहुल कुल यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आमदार राहुल कुल यांच्याकडे यापूर्वी बारामती लोकसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता समन्वयकपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या समन्वयाचा भार त्यांच्यावर असणार आहे. भाजपने माझ्यावर संघटनात्मक पदाची जबाबदारी दिली असून टी मी यशस्वीपणे पार पाडेन अशी प्रतिक्रिया राहुल कुल यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे. केंद्र व राज्य सरकारची कामे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच संघटनात्मक रचना अधिक मजबूत करण्यावर आपला भर राहील असेही कुल यांनी सांगितले.

समन्वयकपदाच्या जबाबदारीबद्दल राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानून सर्वच वरिष्ठ नेत्यांचा विश्वास सार्थ करू दाखवणार असल्याचेही राहुल कुल यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d