आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

युवा नेते पार्थ पवार यांचं परफेक्ट टाईमिंग; पदाधिकारी आणि पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांना बळ देणार

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र तथा युवा नेते पार्थ पवार हे सक्रिय होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत त्यांनी पुण्यासह विविध भागातील पदाधिकारी व पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटीचा सपाटा सुरू केला आहे. कार्यकर्त्यांना बळ देऊन संघटना मजबूत करण्यावर युवा नेते पार्थ पवार यांचा भर असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-सेना युती सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सुत्रेही आपल्या हाती घेतली आहेत. अशातच अजितदादांचे पुत्र तथा युवा नेते पार्थ पवार यांनीही आता पक्ष संघटनेतील कामकाजात सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत पार्थ पवार यांनी पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर त्यांनी लक्ष दिले आहे.

मागील काही दिवसांत पार्थ पवार हे पुणे शहरात अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या अनुषंगाने पार्थ पवार यांच्या भेटीगाठींना महत्व आले आहे. पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही पार्थ पवार यांच्याकडून संवाद साधला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची व्यस्तता वाढत असताना पार्थ पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. तसेच पुणे शहरात विविध भागात जाऊन भेटीगाठीही घेतल्या. संघटना मजबूत करत चांगले काम करण्याच्या सूचना पार्थ पवार यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांना आवश्यक तिथे पाठबळ देण्याची ग्वाहीदेखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d