
संकेश्वर : वृत्तसंस्था
बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक बसल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हत्तरकीजवळील बेनकुळी या गावात हा अपघात झाला. त्यामध्ये डॉक्टर पतीही गंभीररित्या जखमी झाले आहेत.
डॉ.श्वेता मुरगुडे आणि कन्या सिया अशी अपघातात मृत पावलेल्या मायलेकीची नावे आहेत. तर डॉ. सचिन मुरगुडे हेही या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आहेत. डॉ. सचिन मुरगुडे हे संकेश्वर येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेत. काल दुपारी ते आपली पत्नी डॉ. श्वेता आणि मुलगी सिया यांच्यासह बंगळूरहून संकेश्वरला येत होते. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने हा अपघात झाला.
या अपघातात डॉ. श्वेता आणि सिया यांचा मृत्यू झाला. तर डॉ. सचिन मुरगुडे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. डॉ. श्वेता याही प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ होत्या. त्यांची मुलगी सिया ही इयत्ता तिसरीत शिकत होती. त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.