
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आनंदी देशाच्या अहवालावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या विचारांमुळे आपण १३६ व्या स्थानावर पोहोचलो असल्याचे ते म्हणाले आहेत.
हंगर रँक १०१ वा क्रमांक, स्वातंत्र्य क्रमांक ११९ आणि आनंदी देशांच्या यादीत आपला भारत देश १३६ व्या स्थानावर आहे. केंद्र सरकारच्या विचारांमुळे आपण १३६ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. देशात जर अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच आम्ही घृणा आणि रागाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर यायला वेळ लागणार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
डेनमार्क, नेपाळ, फिनलंड, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारखे देश भारत देशापेक्षा जास्त आनंदी आहेत. भारत हा आनंदी देशांच्या तुलनेत खालच्या पायरीवर का आहे यांचाही शोध घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.