आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

गुजरात विधानसभेच्या निवडणुकींचा सामना रंगणार ; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गुजरात विधानसभेत १८२ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभेची निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दोन टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे.

गुजरात विधानसभेची निवडणूकचे पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी हे मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान पार पाडणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गुजरात होमग्राउंड आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष गुजरात विधानसभेकडे लागले होते. निवडणूक कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसोबतच गुजरात विधानसभेची देखील निवडणूक जाहीर होईल अशी अपेक्षा होती.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us