आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

Elections Breaking । देशातील पाच राज्यांमध्ये निवडणूका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान, जाणून घ्या सविस्तर…!

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. देशातील पाच महत्त्वाच्या राज्यात लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजणार असून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग येणार आहे.

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल, तर ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला होणार आहे.

तसेच राजस्थानमध्ये आणि तेलंगणामध्ये अनुक्रमे २३ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागेल. मध्यप्रदेश मध्ये सुद्धा १७ नोव्हेंबरला मतदान होऊन ३ तारखेला निकाल लागेल. या निवडणूकांमध्ये जनता कोणत्या पक्षाला कौल देणार हे याचीच उत्सुकता राहणार आहे.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us