
मुंबई : प्रतिनिधी
जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत संपत्तीत मुलाचा हक्क नाही, असे स्पष्टीकरण आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायालयात कौटुंबिक संपत्ती या वादावर याचिका दाखल झाली, या याचिकेवर सुनावणी करताना त्यांनी महत्वपुर्ण निकाल दिला आहे.
वडिलांच्या उपचारासाठी आईने दोन फ्लॅट विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एका मुलाने स्वतःच्या आई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. परंतु न्यायालयाने या मुलालाच खडे बोल सुनावले आहेत. वडिलांनंतर संपूर्ण कुटुंब सुरळीत चालवण्याचा अधिकार आहे. मग तिने पतिच्या उपचारासाठी संपत्ती विकली तर त्यात गैर काय आहे.
कुठलीही संपत्ती विकताना आई वडिलांना मुलाच्या परवानगीची गरज नसणार आहे. त्यांना संपत्ती विकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुमचे आई-वडील जोपर्यंत जिवंत आहे,तोपर्यंत मुलाचा संपत्तीवर हक्क नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि माधव जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.