आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

Big Breaking : महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रश्नासंदर्भात शरद पवार यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला तब्बल अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापपर्यंत राज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती केली नाही. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी  नरेंद्र मोदी यांचे १२ आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष वेधत त्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी केली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर अनेकदा राज्यपाल आणि राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यातूनच राज्यातील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपालांनी निर्णय दिलेला नाही. या संदर्भात अनेकदा चर्चा होवूनही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.

लक्षद्विप येथील काही समस्यांबाबत शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, शरद पवार यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्यपालांनी अडवून ठेवल्याचे सांगितले. तसेच याबाबत लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी याबाबत काय निर्णय घेतात याकडेच राज्याचं लक्ष लागलं आहे.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us