आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
ठाणे

दुर्दैवी..! बाप-लेकीची नैराश्यातून आत्महत्या; एकाच कुटुंबातील तीन आत्महत्यांनी शहापूर हादरले..!

ठाणे
ह्याचा प्रसार करा

ठाणे : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आसनगाव येथे बाप लेकीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी ( दि.१६ मार्च) घडली. विकास सूर्यकांत केदारे ( वय ३४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुण बापाचे नाव आहे. त्याने आपल्या ११ वर्षीय आर्यासोबत ( मुलगी) आत्महत्या केली. विकासने आत्महत्या करण्यापूर्वी दोन पाने सुसाईड नोट लिहून ठेवली.

काही दिवसापूर्वी विकासच्या पत्नीने आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येस त्याला कारणीभूत ठरवले गेले होते. त्यामुळे विकास आणि त्याच्या वयोवृद्ध आईला काही महिने तुरुंगात काढावी लागली. ही सगळी घटना सहन करण्याच्या पलीकडे आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहीत विकासने स्वतःच्या चिमुकलीसह आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी अत्यंत भावनिक सुसाईड लिहून ठेवली. मी कोणाच्याच त्रासामुळे आत्महत्या करत नसल्याचे विकासने सुसाईड नोटमध्ये सांगितले आहे. सुसाईड नोटच्या आधारे शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


ह्याचा प्रसार करा
ठाणे
Back to top button
Contact Us
%d