मुंबई : प्रतिनिधी
एका जमीन व्यवहारप्रकरणी कारागृहात असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना आज कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किडनीसह अन्य आजारांवर उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित व्यक्तींशी जमीन खरेदीचा व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते ऑर्थर रोड कारागृहात आहेत. या दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी ईडी न्यायालयात करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने नवाब मलिक यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.
नवाब मलिक यांना आज कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर किडनी आणि अन्य आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. नवाब मलिक यांना अनेक शारीरीक त्रास होत आहेत. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहेत.