आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

SATARA BREAKING : पुणे-बेंगलोर महामार्गावर कराडनजीक भीषण अपघात; कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

सातारा : प्रतिनिधी  

पुणे-बेंगलोर महामार्गावर कराडनजीक आज दुपारी भीषण अपघात झाला आहे. रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहीण, भाऊ आणि भाच्याचा समावेश असून नितीन पोवार हे कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी आहेत.

मनीषा आप्पासाहेब जाधव, नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव (सर्व रा. राजवाडा, कोल्हापूर) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. याबाबत माहिती अशी की,  पुणे-बेंगलोर महामार्गावर कराडनजीक पाचवड फाटा येथे हा अपघात झाला आहे. कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी नितीन पोवार हे आपल्या बहीण आणि भाच्यासह मुंबईकडे निघाले होते.

पाचवड फाट्याजवळ कारची समोर निघालेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसली. त्यामध्ये कारचा पुढील भाग ट्रकच्या पाठीमागील भागात घुसला. त्यामुळे कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या आपघातावेळी नितीन पोवार हे स्वत: कार चालवत होते. वेगात असताना कारवर नियंत्रण न राहिल्यामुळे ही धडक झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d