
मुंबई : प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलवर राज्य शासनाकडून आकारला जाणारा कर कमी करुन पेट्रोलचे दर ५ रुपयांनी, तर डिझेलचे दर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर इंधनावरील कर कमी करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पेट्रोलचे दर ५ रुपयांनी आणि डिझेलचे दर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात महागाईचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना जनतेला दिलासा मिळणार आहे.