आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत सामाजिक समतेच्या महानायकाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे महानायक, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी बारामतीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीकारी कार्याला उजाळा दिला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समुदायीक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार गणेश शिंदे, तलाठी चेतन पोळ, उपप्रादेशिक वाहन अधिकारी राजेंद्र केसकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, ॲड.विनोद जावळे, माजी नगरसेवक विजय सोनवणे, किसन सोनवणे, राजेंद्र सोनवणे, अशोक सोनवणे, संजय मोरे, शैलेश सोनवणे, वी श्री कांबळे, रमेश साबळे, विजय खरात, साधू बल्लाळ, सुनिल शिंदे, विशाल जाधव, पार्थ गलिंदे, जमिर सय्यद, अमीर शेख, फैय्याज शेख, सलिम शेख, मुनीर तांबोळी, अनिल मोरे, विकास जगताप, मंगलदास निकाळजे, रवींद्र सोनवणे, अक्षय माने, मनोज केंगार, ॲड.धीरज लालबिगे, रोहन गायकवाड, माजी नगरसेविका अनिता जगताप, स्नेहल घाडगे, अरविंद बगाडे, सिद्धार्थ सावंत, अक्षय खरात, अविनाश गायकवाड, दशरथ मांढरे, सिद्धार्थ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन समितीचे सदस्य गणेश सोनवणे, काळूराम चौधरी, बबलू जगताप, प्रा. रमेश मोरे, सोमनाथ रणदिवे, गौतम शिंदे, गजानन गायकवाड, सचिन काकडे, विश्वास लोंढे, आकाश मेमाणे, राहुल कांबळे, कैलास शिंदे, चेतन साबळे, नितीन गव्हाळे यांनी केले होते.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d