आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीत रविवारी मोफत इपिलेप्सी शिबीराचे आयोजन, प्रसिद्ध तज्ञ डॉ. निर्मल सूर्या करणार रुग्णांवर उपचार..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशन यांच्या वतीने बारामतीत रविवारी दि. ७ जानेवारी रोजी इपिलेप्सी (आकडी अपस्मार, फेफरे, फीट येणे) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द न्युरोफिजिशियन डॉ. निर्मल सूर्या व त्यांचे सहकारी रुग्णांवर उपचार करणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सकाळी नऊ वाजल्यापासून रुग्णांची तपासणी सुरु होणार आहे. या शिबीरामध्ये तज्ज्ञ न्युरोफिजिशियन मार्फत मोफत तपासणी व उपचार तसेच ई.ई.जी. तपासणी होणार आहे. रक्ततपासणीसह रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशनही केले जाणार आहे. भौतिकोपचार, व्यवसयोपचार, वाचा व भाषा विकार उपचार या शिबीरात मोफत केले जाणार आहेत.

शिबीरात तपासणीसाठी येणा-या रुग्णास तीन महिन्यांची औषधेही विनामूल्य दिली जाणार आहेत. या शिबीरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाशी किंवा 8626063858, 7083954457 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us