आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BREAKING NEWS : वाढदिवसच ठरला अखेरचा दिवस; मद्यधुंद दुचाकीस्वाराचा वेग ठरला चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्याने बागडत चालेल्या चार वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा वाढदिवसाच्या दिवशीच दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावरील हॉटेल जय शिवमसमोर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आर्हत थोरात याचा वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबीय डॉ.आंबेडकर पुतळा स्मारक येथे सुरु असलेला गाण्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी जात होते. मात्र त्याचवेळी मद्यधुंद अवस्थेत आणि प्रचंड वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने लोखंडी शिडीला धडक दिली आणि ती शिडी त्या चिमुकल्याच्या डोक्यात आदळल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.

कुटुंबियांच्या समोरच हा अपघात झाल्याने कुटुंबियांदेखील हंबरडा फोडला.दरम्यान या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून चिमुकल्याचे आई,वडील आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संकेत खळदकर या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याच्या उद्देशाने काल हॉटेल जय शिवम समोरील चौकात बॅरीगेट्स लावण्यात आले होते.मात्र मद्यधुंद अवस्थेत आणि प्रचंड वेगात असलेल्या दुचाकीस्वराने रस्ता बंद करण्यासाठी लावलेल्या लोखंडी शिडीला जोरदार धडक दिली अन काही कळायच्या आताच आपल्या कुटुंबियांसमवेत आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने जाणाऱ्या आर्हत थोरात या चिमुकल्याच्या डोक्यात ती लोखंडी शिडी आदळल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us