आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

Big News : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीचे समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल सातत्याने चर्चा होत असतानाच आता ईडीकडून कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ८ जून रोजी हजर राहण्याचे या समन्सद्वारे कळवण्यात आले आहे.

यंग इंडियनमध्ये आर्थिक अनियमितता आढळल्यामुळे ईडीने नुकतीच कारवाई केली आहे. वित्त शोध निवारण अधिनियमच्या गुन्हेगारी कलमान्वये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांचीही चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, या समन्सनंतर कॉँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सरकार सूडाच्या भावनेने आंधळी झाली असल्याचा आरोप केला आहे. आम्हाला भीती दाखवण्यासाठी केंद्र सरकार अशा पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांना पुढे करत आहे. मात्र आम्ही न घाबरता आणि न झुकता ठामपणे या गोष्टींचा सामना करू असेही त्यांनी म्हटले आहे.

१९४२ मध्ये नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र सुरु करण्यात आले. त्याही वेळी इंग्रजांनी नॅशनल हेराल्डला दाबण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आताही इंग्रजांची पद्धत अवलंबत मोदी सरकार तेच करत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us