आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार? राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महत्वाचा प्रस्ताव

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या अधिवेशनामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. या अगोदरही अनेकवेळा शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद द्यावे अशी मागणी होत होती. त्यामुळे आता शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे, असे मत अनेक राजकीय व्यक्तींनी मांडले होते. तशी मागणीही केली जात होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच त्या मागणीला पूर्णविराम देण्यात आला होता. मात्र आता खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतच हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर शरद पवार यांची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातील विविध प्रादेशिक व घटक पक्षांनी एकत्र येत संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) स्थापना केली होती.  सोनिया गांधी यांच्यानंतर यूपीएमध्ये शरद पवार यांना महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेतृत्वाची देशपातळीवर पिछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे, असे मत नोंदवले जात आहे.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us