आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाच राज्यातील निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  त्यांनी पाच राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागवून घेतले आहेत. त्यानुसार पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश येथील प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे पाठवले आहेत.

पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील दारूण पराभवानंतर काँग्रेस सध्या ॲक्शन मोडवर आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची नवी दिल्ली येथे बैठक पार पडली होती. या पाच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामा घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला असल्याची माहिती रणदीप सुरजेवाला यांनी काल दिली होती.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू, उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल आणि उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. उर्वरित दोन राज्यांतील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे अद्याप बाकी आहेत.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us