आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

महत्वाच्या पदावरील व्यक्तीनं विचार करूनच बोलायचं असतं : अजितदादांचा राज्यपालांना सल्ला

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजीमहाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यानं राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आज राज्यपाल  सोलापुरात असताना शिवप्रेमींनी जोरदार निदर्शने केली. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना, विचार करून बोलायचं असतं, असा सल्ला राज्यपालांना दिला आहे.

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला आहे. आजित पवार म्हणाले, राज्यपाल हे मोठे पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलताना  आपल्यावर सगळ्यांचे लक्ष असते, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे बोलताना आपण विचार करून बोललं पाहिजे.

कोणत्याच राज्य सरकारला एवढा मोठा वर्ग असणारा ओबीसी समाज हा निवडणुकीपासून वंचित रहावा, असे वाटणार नाही. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत, असे राज्यातील सगळ्या  लोकप्रतनिधींचे एकमत आहे. त्यामुळे निवडणुकांचा मुद्दा पुढे येत नाही. मात्र शेवटी तो आधिकार राज्य निवडणूक आयोगाचा आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us