आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

आपल्या बुडाखाली काय जळते, हे भाजपने पाहावं : जयंत पाटील यांची टीका

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजप नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘आपल्या बुडाखाली काय जळते, हे भाजपने पाहावे’ अशी खरमरीत टीका भाजपचे केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना जेवढा निधी दिला नव्हता. त्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे.  महाविकास आघाडीचे आमदार फुटणे हे अशक्य आहे. जरी महाविकास आघाडीतील एखादा आमदार फुटलाच. तो आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाही. त्यामुळे भाजपाने आपल्या बुडाखाली काय जळतयं, ते पहावे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपला त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहणार नसल्याची चिंता आहे. त्यांचे आमदार त्यांच्या सोबत राहण्याची कसलीच शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. २५ आमदार बाहेर पडणार आहेत. आम्ही वेडे आहोत का? राजीनामा देऊन बाहेर पडणे सोपे नाही. महाविकास आघाडीमधील बाहेर पडणाऱ्या आमदारांना लोकं सळो की पळो करतील. या प्रकारची कुठलीच घटना घडणार नाही. या सरकारवर भाजप आमदार देखील खूश असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d