आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG NEWS : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक; नर्मदाबाई पटवर्धन या नावाने चालवत होता फेसबुक पेज..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. आयटी इंजिनियर असलेल्या सागर बर्वे याला अटक करण्यात आली असून त्याला १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, पुण्यातील आयटी इंजिनियर सागर बर्वे हा फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाचे पेज तयार केले होते. या माध्यमातून तो सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवर आक्षेपार्ह पोस्ट करत होता. त्याने नर्मदाबाई पटवर्धन या पेजवरून शरद पवार यांना तुमचाही लवकरच दाभोळकर होईल अशा स्वरूपाची धमकी दिली होती. याचदरम्यान, अमरावतीच्या सौरभ पिंपळकर या भाजपा कार्यकर्त्यानेही धमकी दिलेली होती.

या दोन्ही घटना समोर आल्यानंतर स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिस यंत्रणेने नर्मदाबाई पटवर्धन या पेजची तांत्रिक माहिती काढली. हे पेज सागर बर्वे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले. सागर बर्वे हा पुण्यात वास्तव्यास असून तो आयटी इंजिनियर असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेकडून त्याला अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे सौरभ पिंपळकर या भाजप कार्यकर्त्यानेही उघडपणे शरद पवार यांना धमकी दिली होती. पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला आहे. पिंपळकर हा अमरावती येथील रहिवासी असल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d