आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

मोठी बातमी : उद्या अजितदादांचा बारामती दौरा; विविध कार्यक्रमांसह बारामती तालुका संपर्क दौऱ्यांतर्गत होणार सात सभा..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या गुरुवार दि. १४ मार्च रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विकासकामांच्या पाहणीसह विविध कार्यक्रमांना अजितदादा उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या बारामती तालुका संपर्क दौरा होत असून सात ठिकाणी अजितदादांच्या उपस्थितीत सभा होणार आहेत.

गुरुवारी सकाळी ६ वाजता अजितदादा बारामती शहरातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ७ वाजता सहयोग सोसायटी सभागृहात दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल वाटप कार्यक्रम होणार आहे.  सकाळी ८.३० वाजता डेंगळे गार्डन येथे मौलाना आझाद महामंडळाच्या कर्जमंजुरी पत्रक वाटप आणि मुस्लिम समाज मेळावा होईल. त्यानंतर बारामती बाजार समितीच्या सुपे येथील यांत्रिक चाळणी मशीनचे उदघाटन आणि सुपे उपबाजार नवीन जागेचे भूमीपूजन पार पडेल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुका संपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अजितदादांच्या उपस्थितीत सात सभा होणार आहेत. पहिली सभा सुप्यातील माऊली गार्डन येथे पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता करंजेपूल चौक, सकाळी ११.३० वाजता कोऱ्हाळे बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर, दुपारी २ वाजता माळेगाव बुद्रुक येथील अमरसिंह कॉलनी येथे सभा होईल.

दुपारी ३.३० वाजता निरावागज येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर, सायंकाळी ५ वाजता डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि सायंकाळी ६.३० वाजता बारामती शहरातील मुक्ताई लॉन्स येथे सभा होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत सात सभा घेत आहेत. या सभांमधून अजितदादा काय बोलतात याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us