आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG NEWS : उद्या अजितदादांचा बारामती दौरा; विविध कार्यक्रमांबरोबरच जनता दरबाराचेही आयोजन..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या रविवार दि. २१ मे रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पहाटे ६ वाजता अजितदादांच्या दौऱ्याला सुरूवात होणार असून शहर व परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली जाणार आहे. सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात अजितदादांचा जनता दरबार होणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे रविवारी बारामतीसह पुरंदर आणि पुण्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ९ वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नागरीकांच्या भेटीगाठी व जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी साडेअकरा वाजता तांदूळवाडी येथील ज्येष्ठ नागरीक निवास येथील भोजन कक्ष व करमणूक कक्षाचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी १२-३० वाजता भिगवण रस्त्यावरील द लिफ या रेस्टॉरंटचे उदघाटन कार्यक्रमाला ना. अजित पवार हे उपस्थित राहतील.

दुपारी २ वाजता मोतीबाग येथील मुक्ताई टेक्सटाइल कापड दुकानाचे उदघाटन आणि २-३० वाजता पाहुणेवाडी येथील तावरे कॉम्प्लेक्स आणि राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ना. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ३ वाजता माळेगाव येथील शंकर नागरी पतसंस्थेत भारतीय सैन्य दल व महाराष्ट्र पोलिस दलात भरती झालेल्या विद्यार्थीनींचा सत्कार अजितदादांच्या हस्ते होईल.

दुपारी ३-४५ वाजता माळेगाव साखर कारखान्याच्या गोदामाचे उदघाटन होणार असून ५-३० वाजता पुरंदर येथे आदर्श क्रांती संघटनेच्या सामूहिक विवाह सोहळ्याला अजितदादा उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी पुण्याला रवाना होणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
राजकारण

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us