मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना डेंग्युची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कार्यरत होवू असेही त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्युची लागण झाली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांनाही डेंग्युची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस विश्रांती घेऊन कार्यरत होणार असल्याचं म्हटलं आहे.
कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन. pic.twitter.com/AkkQGS5zhM
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 14, 2023
जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन, असेही त्यांनी नमूद केले आहे.