आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण; ट्विट करत दिली माहिती

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना डेंग्युची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कार्यरत होवू असेही त्यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्युची लागण झाली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांनाही डेंग्युची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काही दिवस विश्रांती घेऊन कार्यरत होणार असल्याचं म्हटलं आहे.

जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन, असेही त्यांनी नमूद केले आहे.

जयंत पाटील यांचा तपासणी अहवाल


ह्याचा प्रसार करा
राजकारण

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us