आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : जय पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाला अजितदादांचा ‘ग्रीन सिग्नल’..? जय पवार यांच्याबद्दलच्या प्रश्नावर दिलं ‘हे’ उत्तर..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना बारामतीत सक्रिय होण्याचा कार्यकर्त्यांनी आग्रह केला. त्यावर अजितदादांनी सिग्नल दिल्यास आपण तयार असल्याचं जय पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात काम करण्याची क्षमता असेल तर यावं असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकप्रकारे अजितदादांनी जय पवार यांना ‘ग्रीन सिग्नल’ दिला असल्याची चर्चा रंगत आहे.

मंगळवारी जय पवार यांनी बारामती शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी संवादही साधला. यादरम्यान, त्यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. याचवेळी कार्यकर्त्यांनी आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्यामुळे जयदादा तुम्ही बारामतीत सक्रिय व्हा असा आग्रह केला. त्यावर जय पवार यांनी अजितदादांनी सिग्नल दिल्यास आपण तयार असल्याचं सांगितलं होतं.

या भेटीनंतर युवा नेते पार्थ पवार यांच्या पाठोपाठ जय पवार हेही राजकारणात सक्रिय होतील अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच काल मुंबईत ‘पुढारी न्यूज’ या नवीन वृत्तवाहिनीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुढारी न्यूजच्या वतीने या तिघांचीही विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान, जय पवार यांच्या राजकारणातील प्रवेशावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.

यावर अजितदादांनी राजकारणात काम करण्याची क्षमता असेल तर नक्की यावं आणि जर क्षमता नसेल तर राजकारणात येवू नये अशा शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळं एकप्रकारे जय पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला अजितदादांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us