आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

एमआयएमसोबत युती..? सुप्रिया सुळे म्हणाल्या; विकासासाठी एकत्र येत असतील तर..

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

समविचारी पक्ष विकासासाठी एकत्र येत असतील तर आनंदच असल्याची प्रतिक्रिया देत खासदार सुप्रिया सुळे यांनी एमआयएमकडून आलेला प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संकेत दिले आहेत.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जायला तयार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे कळवले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

राजकीय विषयांमध्ये एकत्र काम करायचे असेल आणि विकासकामांसाठी एकत्र येणार असतील तर आनंदाची गोष्ट असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कुणी एकत्र येत असतील आणि त्यातून काही चांगले घडणार असेल तर ही चांगलीच बाब आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून एक प्रकारे एमआयएमचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता एमआयएम महाविकास आघाडीत येणार का याकडेच लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d