आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

CRIME NEWS : आधी त्यांचं प्रेम होतं; पण ते संपलं अन् त्यानं तिचे विवस्त्र फोटो सोशल मिडियात केले व्हायरल..!

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी  

प्रेमासाठी वाट्टेल ते अशी म्हण प्रचलित आहे. मात्र प्रेयसीशी संबंध संपल्यानंतर एका तरुणाने तिला त्रास देत विकृतीचा कळस गाठल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंध संपल्यानंतर वारंवार होणाऱ्या त्रासामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यामुळे प्रेयसीचे विवस्त्र छायाचित्र समाज माध्यमात प्रसारीत केल्याप्रकरणी शिरूरमधील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरुर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित तक्रारदार तरुणी आणि फुलफगर यांच्यात प्रेमसंबध होते. मात्र या दोघांमध्ये वाद झाल्यामुळे या तरुणीने या तरूणाशी संबंध संपवले.

या दरम्यान, या तरुणाने पुन्हा या तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने पुण्यातील मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी धर्मेंद्र फुलफगर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मात्र हा तरुण पुन्हा या तरुणीला त्रास देऊ लागला. तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणू लागला. त्यातूनच त्याने संबंधित तरुणीचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केले. ही बाब लक्षात आल्यानंतर या तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us